११ नोव्हेंबर २०१९ ठळक घडामोडी (चालू घडामोडी)
1) माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे चेन्नई येथे हृदयविकाराने निधन झाले.
– ते 86 वर्षांचे होते.
– ते 1955 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी होते.
– 12 डिसेंबर 1990 रोजी मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती.
– 1990 ते 1996 या कालखंडात ते मुख्य निवडणूक आयुक्त होते.
– आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी. त्यांची कारकीर्द ऐतिहासिक ठरली.
– त्यांना प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
2) पश्चिम बंगाल मध्ये बुलबुल चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वादळाने आतापर्यंत 10 लोकांचे बळी घेतले आहे.
3) अयोध्या विषयक (रामजन्मभूमी) निकाल देणारे 5 न्यायाधीश – सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. अब्दुल नाझीर.
4) शिवसेनेसोबत सत्तास्थापनेबाबत सहमती होऊ न शकल्याने महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष राहिलेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यात अक्षमता दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सोबत आघाडी सरकार स्थापन करेल अशी चर्चा आहे.
2019 विधानसभा निवडणुकीत पक्षनुसार संख्याबळ –
– भाजप- 105
– शिवसेना- 56
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- 54
– काँग्रेस- 44
5) भारत – बांग्लादेश यांच्यात झालेल्या 3 सामन्यांच्या टी ट्वेन्टी- T20 मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवला आहे.
– अंतिम सामन्यात भारताने बांग्लादेशचा 30 धावांनी पराभव केला.
– अंतिम सामन्यात दीपक चहर सामनावीर ठरला.
– मालिकावीर – दीपक चहर
– नागपूर येथे झालेल्या या सामन्यात भारताकडून ट्वेन्टी 20 सामन्यातील पाहिली हॅट्ट्रिक दीपक चहरने नोंदवली. ट्वेन्टी 20 मधील ही 12वी हॅट्ट्रिक होती.
– चहरची 7 धावा देऊन 6 बळी ही ट्वेन्टी 20 क्रिकेट मधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
– 6 बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. या आधी अजंता मेंडीसने दोनदा आणि युजवेंद्र चहलने एकदा 6 बळी घेतले होते.
Discussion about this post