१३ नोव्हेंबर २०१९ ठळक घडामोडी (चालू घडामोडी)
1) कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्यात यशस्वी न ठरल्यामुळे १२ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. संविधानाच्या अनुच्छेद ३५६ नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठवलेल्या शिफारशींना राष्ट्रपतींनी संमती दिली.
२) गुरू नानक यांची ५५० वी जयंती प्रकाश पर्व म्हणून साजरी केली गेली. कपूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी (पंजाब) येथे आयोजित केलेल्या समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित होते.
३) शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा कार्यभार प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
४) नकली वस्तूंचे व्यवहार रोखण्यासाठी अमेझॉनने भारतात प्रोजेक्ट झिरो सुरू केला आहे.
५) भावांतर भरपायी योजना (BBY) ही योजना हरियाणा सरकारने सुरू केली असून, या योजनेनुसार शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत विकल्या गेलेल्या शेती उत्पादनांना सरकार नुकसान भरपाई देणार आहे.
६) दुसरी पॅरिस शांतता परिषद फ्रान्स येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उपस्थित राहिले आहे.
७) BRICS ची 9 व्यापार मंत्र्यांची मिटिंग ब्राझीलिया येथे होत आहे. या बैठकीला भारताचे व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उपस्थित राहतील.
८) मॅच फिक्सिंग संबधी अपराध हे गुन्हेगारी कृत्य असेल असे ठरवणारा श्रीलंका हा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला.
Discussion about this post