२६ ऑक्टोबर २०१९ ठळक घडामोडी (चालू घडामोडी)
१) २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत सीव्हीसी- सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ही दक्षता जागृती सप्ताह (Vigilance Awareness Week) साजरा करणार आहे.
२) लखनऊस्थित सिटी मॉन्टेसरी स्कूलचे सर्वाधिक विद्यार्थी (५५५४७) असल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आले आहे.
३) भाजप नेते पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची मिझोरमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे.
४) गिरीशचंद्र मुर्मू यांची जम्मू-काश्मीरचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे.
५) राधा कृष्ण माथूर यांची लडाखचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे.
६) दिनांक २४-२५ ऑक्टोबर २०१९रोजी अझरबैजानच्या बाकू येथे नॉन अलाइनमेंट मूव्हमेंटचे (नाम चे ) १८ वे शिखर सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भारतीय शिष्टमंडळाचे शिखर परिषदेत नेतृत्व केले.
७) इव्हो मोरालेस हे बोलिव्हियाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले आहेत.
८) बंगळुरुमध्ये क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी जिंकण्यासाठी कर्नाटकने तामिळनाडूचा पराभव केला.
Discussion about this post