३० ऑक्टोबर २०१९ ठळक घडामोडी (चालू घडामोडी)
१) न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. ते १ नोव्हेंबरला शपथ घेतील. ते भारताचे ४७ वे सरन्यायाधीश असतील.
२) प्रखर – दिल्ली पोलिसांनी रस्त्यांवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रखर नावाच्या पोलीस व्हॅन्स सुरु केल्या आहे.
३) परमहंस योगानंद कॉईन्स
परमहंस योगानंद यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या स्मृती नाण्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनावरण केले. परमहंस योगानंद यांनी खालील संस्था स्थापन केल्या –
a ) Yogoda Satsanga Society of India
b ) Self-Realisation Fellowship
४) स्कॉटलंडमधील कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने गोल्डन ड्रॅगन हा पुरस्कार जिंकला.
५) आयसीसीने बांगलादेशच्या शाकिब अल हसनला आयपीएलच्या भ्रष्टाचारविरोधी कोडच्या उल्लंघनाबद्दल दोन वर्षांसाठी बंदी घातली. एप्रिल २०१८ मध्ये आयपीएल दरम्यान शाकीब अल हसनला काही बुकींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शाकीबने ही बाब आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे कळवली नाही. त्यामुळे आयसीसी नियमांचा भंग केल्या प्रकरणी शाकीबवर बंदी घालण्यात आली आहे.
६) UNHCR (संयुक्त राष्ट्रांची प्रमुख रेफुजी एजेन्सी) च्या प्रथम महिला प्रमुख जपानच्या सदाको ओगाटा यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.
Discussion about this post