७ नोव्हेंबर २०१९ ठळक घडामोडी (चालू घडामोडी)
१) तटरक्षक दलाने गोवा किनाऱ्यावर क्षेत्र स्तरीय शोध व बचाव कार्यशाळा व सराव (रेसरेक्स -२०१९) आयोजित केला.
२) फिनलँडचे परराष्ट्रमंत्री पेक्का हाविस्तो भारत दौर्यावर आहेत.
३) राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ‘गुजरात टेररिझम कंट्रोल अँड ऑर्गनाईझ क्राईम्स‘ (जीसीटीओसी) विधेयकास मान्यता दिली आहे. या विधेयकाला गुजरात विधानसभेने २०१५ साली मान्यता दिली होती. या कायद्यानुसार टेलिफोन वरील इंटरसेप्टेड संभाषणे योग्य पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही.
४) १९ वी आयओआरए (इंडियन ओशन रिम असोसिएशन) मंत्रिमंडळाची बैठक ७ नोव्हेंबरला अबू धाबी येथे होणार आहे. या परिषदेची थीम ‘Promoting a Shared Destiny and Path to Prosperity in the Indian Ocean’ हि आहे.
५) ६ नोव्हेंबर हा युद्ध आणि सशस्त्र संघर्षातील पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो.
६) फ्रीडम हाऊसने आपला ‘फ्रीडम ऑन नेट’ हा २०१९ चा ‘सोशल मीडियाचे संकट’ हे शीर्षक असलेला अहवाल प्रकाशित केला.
Discussion about this post